मुंबई - स्थलांतरीत कामगारांची ओळख पटवून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस त्यांची नाव नोंदणी करत आहे. स्थलांतरितांची व्यथा दूर करण्याच्या उद्देशाने सामान्य सेवा केंद्राच्या माध्यमातून नाव नोंदणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सामान्य सेवा केंद्राच्या माध्यमातून स्थलांतरित कामगारांची नाव नोंदणी सुरू - migrant labours news
स्थंलातरीत कामगारांची ओळख पटवून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस त्यांची नाव नोंदणी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थलांतरित कामगारांच्या समस्या हा सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सीएससी योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या वेदना कमी करण्याचा विचार करीत असल्याचे ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडियाचे मुख्य कार्यकारी दिनेश त्यागी यांनी सांगितले. एचडीएफसी बँकेने आयोजित केलेल्या ऑनलाइन चर्चा सत्रात ते बोलत होते.
त्यागी यांनी स्थलांतरीत कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी हाती घेतल्या जाणार्या योजनांविषयी संपूर्ण माहिती दिली नाही. तर स्थलांतरीत कामगारांसाठी सीएससी ग्रामीण नौकरी पोर्टल सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.