महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बिल गेट्स म्हणतात, 'ही' माझी आजवरची सर्वात मोठी चुक होती!

सध्या अँड्राईडने स्मार्टफोनमधील ऑपरेटिंग सिस्टिमची ८५ टक्के बाजारपेठ व्यापली आहे. तर मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमचे कुठेही स्थान दिसत नाही.

बिल गेट्स

By

Published : Jun 25, 2019, 2:35 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - कॉम्प्युटर, लॅपटॉपमधील ऑपरेटिंग सिस्टिममध्ये मायक्रोसॉफ्टचे वर्चस्व आहे. मात्र मोबाईलमध्ये गुगलच्या अँड्राईड या ऑपेरटिंग सिस्टिमचीच सर्वात अधिक चलती आहे. ही अँड्राईड ऑपरेटिंग खरेदी न करणे आजपर्यंतची सर्वात मोठी चूक असल्याची कबुली मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिली. ते व्हेंचर कॅपिटल असलेल्या व्हिलेज ग्लोबलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

गुगलला अँड्राईड विकसित करण्याची परवानगी देणे ही मोठी चूक ठरल्याचे गेट्स यांनी म्हटले आहे. सॉफ्टवेअर कंपन्यांना विशेषत: प्लॅटफॉर्मला अँड्राईड हे फायदेशीर ठरले आहे. अँड्राईड हे अॅपल फोनशिवाय इतर मोठे माध्यम ठरले आहे. ही बाब नैसर्गिकरित्या मायक्रोसॉफ्टला (बाजारपेठेत) विजयी करणारा ठरली असती, असे गेट्स म्हणाले. अॅपलशिवाय अँडाईडच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा पर्याय होता. गुगलकडून मायक्रोसॉफ्टला ४०० अब्ज डॉलर हस्तांतरित करता आले असते, असेही ते म्हणाले.

अँड्राईडचे स्मार्टफोनच्या बाजारपेठेवर वर्चस्व

  • गुगलने अँड्राईड हे केवळ ५० दशलक्ष डॉलरला २००५ मध्ये खरेदी केले. पहिल्या आयफोनची निर्मिती २००७ मध्ये करण्यात आली.
  • अँड्राईड असलेले साधन २००८ मध्ये बाजारात आले.
  • सध्या अँड्राईडने स्मार्टफोनमधील ऑपरेटिंग सिस्टिमची ८५ टक्के बाजारपेठ व्यापली आहे. तर मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमचे कुठेही स्थान दिसत नाही.
  • एवढेच नव्हेतर मायक्रोसॉफ्टने वापरकर्त्यांना अँड्राईड अथवा आयओएस सुरू करायला सांगितले. विंडोज १० मोबाईलला देण्यात येणारे सुरक्षेचे अपडेट १० डिसेंबरनंतर बंद करण्यात येणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने जाहीर केले.

गुगलच्या वर्चस्वाने मायक्रोसॉफ्टचे काय झाले नुकसान-

  • गुगल आणि मायक्रोसॉफ्ट हे एकमेकांच्या स्पर्धक कंपन्या आहेत. गुगलच्या सर्चइंजिनच्या वाढत्या वापरानंतर मायक्रोसॉफ्टचे बिंग हे सर्च इंजिन मागे पडले.
  • गुगलच्या अँड्राईडमुळे मायक्रोसॉफ्टला स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ ताब्यात घेणे शक्य झाले नाही.

गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाचा आणि चीफ सॉफ्टवेअर आर्किटेक्ट पदाचा २००० राजीनामा मध्ये दिला. सध्या मूळ भारतीय वंशाचे सत्या नाडेला हे २०१४ पासून कंपनीचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details