हैदराबाद - वैयक्तिक गोपनीयता हा मानवी हक्क आहे. सुरक्षा आणि डाटाबाबत गोपनीयतेसाठी जागतिक पातळीवर नियम लागू व्हावेत, असे मत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी व्यक्त केले. नाडेला हे तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग मंत्री के. टी. रामाराव यांच्याबरोबर ऑनलाईन बोलत होते.
वैयक्तिक गोपनीयता आणि सुरक्षेचे जगभरात नियमन झाल्यास तंत्रज्ञान उत्पादने आणि सेवा सुरक्षेसाठी उपयुक्त होईल, असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी म्हटले आहे. सुरक्षा आणि वैयक्तिक गोपनीयतेबाबत विचारलेल्या प्रश्नांवर सत्या नाडेला बोलत होते. पुढे नाडेला म्हणाले की, कोरोना महामारीमुळे जगभरात डिजीटल परिवर्तन घडत आहे. भविष्यात जगाने कुठे असायला हवे, हे मी पाहत आहे. ज्याप्रमाणे अन्न सुरक्षा, सुरक्षेचे कायदे आहेत, त्याचप्रमाणे डाटाचे नियमन करण्यासाठी नियम हवे आहेत वैयक्तिक गोपनीयता आणि सुरक्षेचे नियम जगभरात लागू व्हावे. त्यामुळे त्यांचे पालन करणे शक्य होईल.
हेही वाचा-धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल दरवाढीचे खापर फोडले जागतिक बाजारावर!