नवी दिल्ली- प्रवासी वाहनांच्या विक्रीपाठोपाठ आलिशान चारचाकी उत्पादक कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. मर्सिडिज-बेन्झच्या वाहनांची जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान गतवर्षीच्या तुलनेत १५.८९ टक्क्यांनी विक्री घटली आहे.
मर्सिडिजने गतवर्षी जानेवारी ते सप्टेंबर ११ हजार ७८९ वाहनांची विक्री केली होती. मात्र, यंदा ९ हजार ९१५ वाहनांची विक्री केली आहे. असे असले तरी कंपनीने समाधाकारक विक्री झाल्याचे म्हटले आहे. आर्थिक आव्हाने असतानाही सप्टेंबरमध्ये वाहनांची समाधानकारक विक्री झाली आहे. आलिशान चारचाकींच्या बाजारपेठेत आघाडीचे स्थान टिकविल्याचा आनंद असल्याचे मर्सिडिज-बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मार्टिन शेवेन्क यांनी म्हटले आहे.