महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाच्या संकटाने मारुतीला ब्रेक; 'मे'मध्ये विक्रीत 86 टक्के घसरण - Maruti Suzuki sale in may

मारुती सुझुकीच्या वाहनांची मे महिन्यात एकूण 18 हजार 539 एवढी विक्री झाली आहे. गतवर्षी मारुतीच्या वाहनांची मे महिन्यात एक लाखाहून अधिक वाहनांची विक्री झाली होती.

Maruti suzuki
मारुती सुझुकी

By

Published : Jun 1, 2020, 2:14 PM IST

नवी दिल्ली - कोणाच्या संकटाने देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक मारुती सुझुकीच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. मारुतीच्या विक्रीत मेमध्ये ते 86.23 टक्के एवढी विक्रमी घसरण झाली आहे.

मारुती सुझुकीच्या वाहनांची मे महिन्यात एकूण 18 हजार 539 एवढी विक्री झाली आहे. गतवर्षी मारुतीच्या वाहनांची मे महिन्यात एक लाखाहून अधिक वाहनांची विक्री झाली होती. मारूतीच्या वाहनांच्या विक्रित मे महिन्यात 88.93 टक्के घसरण झाली आहे.

गतवर्षी देशात मे महिन्यात 1 लाख 25 हजार 552 वाहनांची विक्री झाली होती. मारूतीने 4 हजार 651 वाहनांची गेल्या महिन्यात निर्यात केली आहे. हे गतवर्षीच्या मे महिन्यातील निर्यातीहून सुमारे 48 टक्के कमी आहे.

केंद्र सरकारने टाळेबंदी शिथील केल्यापासून देशातील उत्पादन प्रकल्प सुरू केल्याचे मारुतीने म्हटले आहे. त्यासाठी सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत आहे.

येथील प्रकल्प आहेत सुरू

मनेसर येथील प्रकल्प 12 मे तर गुरुग्राममधील प्रकल्प 18 मे रोजी सुरू करण्यात आला आहे. याशिवाय सुझुकी मोटर्सने कंत्राटी पद्धतीने गुजरातमधून उत्पादन सुरू केले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचना प्रमाणे देशातील विविध शहरात शोरुम सुरू करण्यात आली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details