नवी दिल्ली -देशातील सर्वात मोठी कार उत्पादक मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) मोठी घोषणा केली आहे. मारुतीने विविध मॉडेलची 1,81,754 वाहने परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनांमध्ये सियाझ, विटारा ब्रेझ्झा, एरटिगा, आणि एक्सएल 6 आदी मॉडेलचा समावेश आहे.
जबाबदार कॉर्पोरेट आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करत पेट्रोलची काही मॉडेल परत मागविण्याचा निर्णय घेतल्याचे मारुती सुझुकी कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. विविध मॉडेलच्या 1 लाख 81 हजार 754 वाहनांमध्ये दोष असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 पर्यंत उत्पादन घेण्यात येणाऱ्या या वाहनांचे परीक्षण करण्यात येणार आहे. हे वाहने जगभरातून परत मागविली जाणार आहेत. त्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने दोष असण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.
हेही वाचा-कोविड मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला उशीर; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
वाहनांचे सदोष पार्ट नोव्हेंबर 2021 पर्यंत बदलून देण्यात येणार
ग्राहकांचे हित लक्षात घेऊन स्वच्छेने वाहने परत घेतली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वाहनांचे परीक्षण आणि मोटर जनरेटर युनिट बदलून देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. वाहन मालकांशी अधिकृत वर्कशॉपच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येत असल्याचे मारुती सुझुकी कंपनीने म्हटले आहे. वाहनांचे सदोष पार्ट नोव्हेंबर 2021 पर्यंत बदलून देण्यात येणार आहे. मोटर जनरेटरचा उपयोग पेट्रोल इंजिनमधून अधिक उर्जा निर्मिती करण्यासाठी होतो.
ग्राहकांना हा दिल्ला सल्ला
ग्राहकांनी पाणी साचलेल्या भागात वाहने चालवू नये, अशी कंपनीने म्हटले आहे. तसेच इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक पार्टवर पाण्याचे फवारे टाकू नये, असा कंपनीने ग्राहकांना सल्ला दिला आहे.
हेही वाचा-प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग दिल्याने देशाच्या प्रतिमेवर परिणाम; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
दरम्यान, गतवर्षी मारुती सुझुकीने वॅगनॉर आणि बलेनो या मॉडेलची 1,34,885 वाहने परत मागविली आहेत. गतवर्षी जुलैमध्ये मारुतीने वाहनांची तपासणी करून सदोष फ्यूएल पंप बदलले होते.
हेही वाचा-दिल्ली विधानसभेत आढळले इंग्रज राजवटीच्या काळातील गुप्त भुयार; लाल किल्ल्यापर्यंत पोहोचतो रस्ता