नवी दिल्ली - मारुती सुझुकीने बीएस-६ इंजिन क्षमतेची इग्नीस कार लाँच केली आहे. या कारची ४.८९ लाख ते ७.१९ लाख किंमत (एक्स-शोरुम दिल्ली) आहे.
नवीन इग्नीसला १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटो गिअर शिफ्टचा पर्याय आहे. एसयूव्हीसारखी अधिक वैशिष्ट्य़े असलेल्या कारची मागणी वाढत असल्याचे आम्हाला दिसून येत आहे. नवीन इग्नीसची संरचना आणि मोकळी जागा असलेले इंटिरिअर हे ग्राहकाला आवडेल, असा विश्वास एमएसआयचे व्यवस्थापकीय संचालक केनेची आयुकावा यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-हिरो मॉटोकॉर्प संशोधनात करणार १० हजार कोटींची गुंतवणूक