महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जीएसटी कपातीचा फायदा; मारुतीची इको रुग्णवाहिका ८८ हजार रुपयांनी स्वस्त - इको रुग्णवाहिका

नुकतेच जीएसटी परिषदेने रुग्णवाहिकांवरील जीएसटी दर हा 28 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मारुती सुझुकीने जीएसटी कपातीचा हा लाभ ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

Maruti  Eeco ambulance
मारुती इको रुग्णवाहिका

By

Published : Jun 18, 2021, 10:32 PM IST

नवी दिल्ली- मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) रुग्णवाहिकेच्या प्रकारातील ईको ही व्हॅन ८८ हजार रुपयांनी स्वस्त केली आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) कपातीमुळे मारुतीने ही किमत कमी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना ईको ही व्हॅन 6,16,875 (एक्स-शोरुम दिल्ली) रुपयांना खरेदी करता येणार आहे.

नुकतेच जीएसटी परिषदेने रुग्णवाहिकांवरील जीएसटी दर हा 28 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मारुती सुझुकीने जीएसटी कपातीचा हा लाभ ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटीच्या कपातीनंतर इको रुग्णवाहिका 6,16,875 (एक्स-शोरुम दिल्ली) उपलब्ध होणार असल्याचे मारुतीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. ही दर कपात 14 जूननंतर लागू होणार नसल्याचे मारुती सुझुकीने म्हटले आहे.

हेही वाचा-देशात प्रथमच! सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेल्या विमानाचे आंतरराष्ट्रीय उड्डाण

जीएसटी कपातीची वित्त मंत्रालयाने काढली होती अधिसूचना-

वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाने कोरोनाशी निगडीत उपकरणे, सॅनिटायझर, पल्स ऑक्सिमीटर, टेस्टिंग कीट, रुग्णवाहिका आणि तापमापिका यांच्या किमती कमी केल्याची अधिसूचना १४ जूनला काढली होती. त्यानंतर वस्तुंच्या उत्पादकांना नियमाप्रमाणे जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना द्यावा लागत आहे.

हेही वाचा-पीएमसी बँक तोडगा : आरबीआयकडून सेंट्रमला लघू वित्त बँक स्थापण्याची परवानगी

कोरोना महामारीची पार्श्वभूमीवर जीएसटी परिषदेने कोरोनाशी निगडीत उपकरणांवरील जीएसटी दर कमी केले आहेत. मात्र, कोरोना लशींवरील जीएसटी दर 5 टक्के कायम ठेवला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 44 वी बैठक 12 जूनला पार पडली आहे. त्यामध्ये खालील प्रमाणे दर कमी केले आहेत.

अनुक्रमांक वस्तुचे नाव सध्याचा दर शिफारस केलेला जीएसटीचा दर
1 टोसिलीझुमॅब 5% निरंक
2 अॅम्फोटेरिसीन बी 5% निरंक
3 रेमडेसिवीर 12% 5%
4 कोरोनावरील उपचाराकरिता मान्यता असलेले औषधे लागू असलेले दर 5%
5 वैद्यकीय ऑक्सिजन 12% 5%
6 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर/ जनरेटरसह वैयक्तिक आयात केलेल्या या वस्तू 12% 5%
7 कोव्हिड टेस्टिंग किट 12% 5%
8 प्लस ऑक्सिमीटर, वैयक्तिक आयात केलेल्या या वस्तू 12% 5%
9 हँड सॅनिटायझर 18% 5%

ABOUT THE AUTHOR

...view details