हैदराबाद - डिलिव्हरी बॉय हा मुस्लिम धर्माचा असल्याने त्याच्याकडून अन्न घेण्यास एका ग्राहकाने नकार दिला. या ग्राहकाविरोधात डिलिव्हरी बॉयने तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय कुमार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
धर्म पाहून फूड डिलिव्हरी घेण्यास नकार देणाऱ्या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi Business News
ऑनलाईन फूडची घरपोहोच सेवा घेताना धर्म पाहणे हैदराबादमधील एका ग्राहकाला भोवले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
संग्रहित - स्विग्गी
अजय कुमार याने ऑनलाईन फुड सेवा देणाऱ्या स्विग्गी कंपनीकडून घरपोहोच अन्न मागविले. त्याप्रमाणे डिलिव्हरी एजंट मुदासिर हा अन्न घरी घेवून पोहोचला. मात्र अजय कुमार याने ती डिलिव्हरी स्विकारण्यास नकार दिला.
हिंदू डिलिव्हरी बॉयनेच अन्न घरपोहोच आणावे, असे अजय कुमार याने मुदासिर यांना सांगितले. मुस्लिम व्यक्तीकडून नको, असेही त्याने सांगितले. याप्रकरणी मुदासिर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.