मुंबई - लक्ष्मी विलास बँक आणि डीबीएस इंडियाच्या विलिनीकरणाची नियोजित योजना आरबीआयने निश्चित केल्याप्रमाणे शुक्रवारी जाहीर केली नाही. ही योजना पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयने एका महिन्याचे निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर आरबीआयने लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकरणाचा आराखडा १७ नोव्हेंबरला जाहीर केला आहे. विलिनीकरणाचा अंतिम आराखडा २० नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले होते. या आराखड्यातून ९४ वर्षांच्या जुन्या बँकेच्या समस्येवर १६ डिसेंबरपर्यंत तोडगा निघेल, असेही आरबीआयने म्हटले होते.
हेही वाचा-लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध, असा होणार परिणाम
लक्ष्मी विलास बँकेत कोणाचा किती आहे हिस्सा
- के. आर. प्रदीप यांचा ४.८ टक्के हिस्सा आहे. तर एन. राममृथम, एन. टी. शाह आणि एस. बी. प्रभाकरण यांचा प्रत्येकी २ टक्के बँकेत हिस्सा आहे.
- तर किरकोळ समभागधारकांचा बँकेत ४५ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.
- संस्थात्मक गुंतवणूकदार आणि इंडियाबुल्स हाउसिंगचा बँकेत २० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. याशिवाय इतर गुंतवणुकदारांचे शेअरमध्ये ३ टक्क्यांहून कमी गुंतवणूक आहे.