नांदेड - वाढत्या कोरोनाच्या रुग्णांचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा टाळेबंदीत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही वाढ दि. 23 जुलैच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे. या संबंधीचे आदेश रविवारी (दि. 19 जुलै) रात्रीच्या उशिरा काढण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात 'या' तारखेपर्यंत वाढले 'लॉकडाऊन' - नांदेड लॉकडाऊन बातमी
नांदेड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा आटोक्यात येत नसल्याने आधिच सुरू असलेल्या टाळेबंदीत आणखी वाढ करण्यात आली आहे. आता 23 जुलैच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत टाळेबंदी सुरू असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली
नांदेड जिल्ह्यात इतर जिल्ह्यांप्रमाणे वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येला अटकाव घालण्यासाठी मागच्या सोमवारपासून टाळेबंदीचे आदेश काढण्यात आले. या संचारबंदीचा नागरिकांकडून काटेकोरपणे पालन केले गेले. मात्र, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सोमवारी रात्री संपणारी संचारबंदी आता गुरुवारपर्यंत कायम असणार आहे. 24 जुलैपासून अटी व शर्तीसह मिशन बिगेन अगेन नुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व खासगी आस्थापने चालू ठेवण्यात मुभा असणार असल्याचे आदेश नमूद करण्यात आले आहे.
मागच्या आठ दिवसांपासनू नांदेड जिल्ह्यातील नागरिक टाळेबंदीचे काटेकोरपणे पालन करत आले आहेत. पुढील काळातही सर्वांना टाळेबंदीचे पालन करायचे आहे. यासाठी सजग नागरिक म्हणून आपण सगळे खबरदारी घेऊन कोरोनाचे संकट संपवू, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.