नवी दिल्ली - सरकते जिने आणि उद्वाहिनीचे (लिफ्ट) उत्पादन करणारी कोन कंपनीने पुण्यात नवे तंत्रज्ञान केंद्र सुरू केले आहे. त्यासाठी कंपनीने सुमारे १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
कोनने पुण्यात २० हजार स्क्वेअर फूटची जागा भाड्याने घेतली आहे. त्याठिकाणी सुमारे १२० लोक काम करणार आहेत. या केंद्रातून व्यवसायावर देखरेख व सेवा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. सखोल संशोधन, तंत्रज्ञानाचा विकास आणि अभियांत्रिकीसाठी भारताबरोबर भागीदारी करण्यात येत असल्याचे कोन इंडियाचे अमित गोस्सॅन यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, कंपनी वाढत्या भारतीय बाजारपेठेला अत्याधुनिक सुविधांनी चांगली सेवा देवू शकते. नुकतेच उद्वाहिनी आणि सरकत्या जिन्यांना इंटरनेट ऑफ थिंग्जने जोडणारी २४ X ७ सेवा लाँच करण्यात आली होती. यामुळे यंत्रणेत कमी दोष होवून ती यंत्रणा बंद पडण्याचे प्रमाण कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे यंत्रणेत कमी दोष असणार आहेत. लवकर दुरुस्ती होणार असल्याने ग्राहकांना खऱ्या अर्थाने मनशांती लाभणार आहे.
हेही वाचा-विदेशी चलन गंगाजळीत विक्रमी वाढ होऊन ४३४.६ अब्ज डॉलरची नोंद