नवी दिल्ली – किया मोटर्स कॉर्पोरेशनने सोनेट हे एसयूव्ही श्रेणीमधील मॉडेल आज जगभरात लाँच केले आहे. हे मॉडेल देशात पुढील महिन्यात उपलब्ध होणार आहे.
किया मोटर्सच्या सोनेट मॉडेलचे उत्पादन हे आंध्रप्रदेशमधील अनंतपूरच्या कारखान्यात घेतले जाणार आहे. त्यानंतर इतर देशांमध्ये वाहनांची निर्यात करण्यात येणार आहे. किया मोटर्सचे सेल्टोज आणि कार्निव्हल या चारचाकीनंतर सोनेट हे देशातील तिसरे चारचाकीचे उत्पादन ठरणार आहे. त्यामुळे किया मोटर्स ह्युदांईची व्हेन्यू, मारुतीची विस्तारा ब्रेझ्झा, टाटा नेक्सॉन आणि महिंद्रा एक्सयूव्ही 300 या चारचाकींबरोबर स्पर्धा करू शकणार आहे.