नवी दिल्ली -अमेरिकेची औषध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने तेलंगणामधील बायॉलॉजिकल ई लिमिटेडबरोबर करार केला आहे. या करारानुसार बायॉलॉजिकल ई लिमिटेड जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लशीचे उत्पादन करणार आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनच्या जानसीन या कोरोना लसीला अमेरिका, युरोपियन युनियन, थायलंड आणि दक्षिण आफ्रिकेने मान्यता दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या माहितीनुसार बायोलॉजिकल ई कंपनी ही जागतिक कोरोना लशीच्या पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग असणार आहे. लस निर्मितीसाठी विविध सेवा असणारी उत्पादन प्रकल्पे ही विविध उपखंडांमध्ये आहेत. अमेरिकेची औषध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने एकवेळ डोस असलेल्या जानसीनच्या वैद्यकीय चाचणीसाठी भारत सरकारबरोबर चर्चा सुरू असल्याचे ५ एप्रिलला म्हटले होते.
हेही वाचा-अपोलो हॉस्पिटल्समध्ये स्पूटनिक व्हीचे लसीकरण; 1250 रुपये प्रति डोसची किंमत!