महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाच्या चाचणीकरता जॉन्सन अँड जॉन्सनची भारत सरकारबरोबर चर्चा सुरू

जॅनसीन या कोव्हिड लशीची भारतात वैद्यकीय चाचणी सुरू करण्यासाठी भारत सरकारबरोबर चर्चा सुरू असल्याचे जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया प्रवक्त्याने म्हटले आहे. या लशीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लस फ्रीजच्या तापमानातही साठवणे शक्य आहे.

Johnson and Johnson
जॉन्सन अँड जॉन्सन

By

Published : Apr 9, 2021, 5:40 PM IST

नवी दिल्ली -देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लशीचा तुटवडा जाणवत आहे. अशा स्थितीत दिलासादायक बातमी आहे. औषधी उत्पादनातील आघाडीची कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोना लशीच्या चाचणीसाठी भारत सरकारबरोबर चाचणी सुरू केली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने तयार केलेली कोरोना लशीचा एकच डोस नागरिकांना घ्यावा लागतो.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनाविरोधातील लशीला मान्यता दिली आहे. या लशीच्या एकवेळच्या डोसला आपत्कालीन स्थितीत फेब्रुवारीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. जॅनसीन या कोव्हिड लशीची भारतात वैद्यकीय चाचणी सुरू करण्यासाठी भारत सरकारबरोबर चर्चा सुरू असल्याचे जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया प्रवक्त्याने म्हटले आहे. या लशीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लस फ्रीजच्या तापमानातही साठवणे शक्य आहे. कोरोनाविरोधातील लस ही सुरक्षित आणि परिणामकारक असण्यावर आमचे संपूर्ण लक्ष केंद्रित आहे.

हेही वाचा-सहाराचे चेअरमन सुब्रता रॉय यांना कोरोनाची लागण

सध्या, भारतात ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका यांची लस तसेच भारत बायोटेकने आयसीएमआरबरोबर तयार केलेल्या लशीचा वापर करण्यात येत आहे. दोन्ही लशींचे उत्पादन भारतामधील कंपन्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा-फेसबुकनंतर लिंक्डइनकडून ५० कोटी जणांचा डाटा लिक

ABOUT THE AUTHOR

...view details