महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जिओच्या हिश्श्याची पाचव्यांदा मोठी खरेदी; केकेआरकडून ११,३६७ कोटींची गुंतवणूक

रिलायन्स जिओचा चार आठवड्यातच पाचव्यांदा मोठा हिस्सा खरेदी होत आहे. जिओ ही देशातील सर्वात नवी आणि सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे.

रिलायन्स जिओ
रिलायन्स जिओ

By

Published : May 22, 2020, 10:32 AM IST

Updated : May 22, 2020, 1:39 PM IST

नवी दिल्ली - टाळेबंदी आणि कोरोनाचे संकट असतानाही रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी असलेल्या जिओच्या व्यवसायिक यशात वरचेवर भर पडत आहे. अमेरिकेन केकेआर अँड कंपनीने रिलायन्समध्ये २.३२ टक्के हिश्श्याची खरेदी केली आहे. त्यामुळे रिलायन्सला ११ हजार ३६७ कोटी रुपये मिळू शकणार आहेत.

रिलायन्स जिओचा चार आठवड्यातच पाचव्यांदा मोठा हिस्सा खरेदी होत आहे. जिओ ही देशातील सर्वात नवी आणि सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. यापूर्वी रिलायन्स जिओमध्ये फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर्स, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स अँड जनरल अटलांटिकने समभागांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल अटलांटिक कंपनीने जिओमध्ये ६ हजार ५९८.३८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले.

जाणून घ्या जिओमधील गुंतवणूक

हेही वाचा-व्हॉट्सअ‌ॅपद्वारे जिओमार्टची वस्तू विक्री 'या' शहरांमध्ये झाली सुरू

जिओचे देशात ३.८८ कोटी ग्राहक आहेत. रिलायन्सने व्हॉट्सग्रुपबरोबर जिओ मार्ट ही सेवा नुकतीच लाँच केली आहे. जिओ मार्टमधून ग्राहकांना व्हॉट्सअॅपवरून किराणा इतर मालाची खरेदी करता येणे शक्य आहे.

हेही वाचा-टाळेबंदीतही भरारी; जनरल अटलांटिकची जिओत ६५९८.३८ कोटींची गुंतवणूक

Last Updated : May 22, 2020, 1:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details