महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जिओच्या ग्राहकांना पहिल्यांदाच कॉलिंगकरिता मोजावे लागणार पैसे; 'हा' आहे नवा दर - मोबाईल चार्जेस

ट्रायच्या निर्णयाने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जिओने कॉलिंगचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त कंपनीने डाटा किंवा कॉलिंगच्या दरात कोणताही बदल केला नाही.

संग्रहित - जिओ

By

Published : Oct 9, 2019, 6:07 PM IST

नवी दिल्ली - तुम्ही जिओची सेवा वापरत असाल तर ही तुमच्यासाठी उपयुक्त बातमी आहे. मोफत कॉलिंगची सेवा देत दूरसंचार क्षेत्रात वर्चस्व निर्माण केलेल्या जिओने पहिल्यांदाच कॉलिंगसाठी दर लागू केले आहेत. जिओच्या ग्राहकांनी इतर दूरसंचार ऑपरेटरच्या क्रमांकावर कॉल केल्यास ६ पैसे प्रति मिनिट आकारण्यात येणार आहेत. त्याचवेळी तेवढ्या किमतीचा मोफत डाटा जिओकडून ग्राहकांना देण्यात येणार आहे.

जिओच्या ग्राहकांनी जिओच्या क्रमांकावर कॉल केल्यास त्यासाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच दूरध्वनी आणि व्हॉट्सअॅपसह इतर अॅपचा वापर करून करण्यात येणाऱ्या कॉलसाठी शुल्क लागू करण्यात येणार नाही.

जिओचे नवे दर


एका दूरसंचार ऑपरेटच्या क्रमांकावरून दुसऱ्या कंपनीच्या दूरसंचार ऑपरेटच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केल्यास शुल्क आकारण्यात येते. हे इंटरकनेक्ट युजेस चार्ज (आययूसी) म्हणून आकारण्यात येते. ट्रायने २०१७ मध्ये १७ पैशांवरून इंटरकनेक्ट युसेज चार्ज हे ६ पैसे केले आहे. हे शुल्क जानेवारी २०२० मध्ये बंद करण्यात येणार असल्याचे ट्रायने जाहीर केले आहे. ही मुदत वाढविण्याबाबत ट्राय सध्या विचार करत आहे.

या कारणाने जिओने लागू केले कॉलिंगचे दर-

जिओ नेटवर्कसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र, यापूर्वी जिओने भारती एअरटेल आणि व्होडाफोनला १३ हजार ५०० कोटी रुपये शुल्क दिले आहे. ट्रायच्या निर्णयाने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जिओने कॉलिंगचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त कंपनीने डाटा किंवा कॉलिंगच्या दरात कोणताही बदल केला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details