महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जिओफायबरचे पोस्ट पेड ब्रॉडबँड १७ जूनपासून सुरू होणार; इन्स्टॉलेशन मोफत! - installation free for Jiofiber service

सध्या, जिओफायबरच्या नव्या पोस्ट पेड ब्रॉडबँडच्या इन्स्टॉलेशनकरिता १,५०० चार्जेस आहेत. हे शुल्क नव्या कनेक्शनसाठी लागू होणार नाही.

Jio
जिओ

By

Published : Jun 15, 2021, 10:11 PM IST

नवी दिल्ली - रिलायन्स जिओने जिओफायबरची पोस्ट पेड ब्रॉडबँड सेवा १७ जूनपासून सुरू करणार आहे. या नव्या पोस्ट पेड सेवेसाठी इन्स्टॉलेशनकरिता शुल्क लागू होणार नाही.

सध्या, जिओफायबरच्या नव्या पोस्ट पेड ब्रॉडबँडच्या इन्स्टॉलेशनकरिता १,५०० चार्जेस आहेत. हे शुल्क नव्या कनेक्शनसाठी लागू होणार नाही. मात्र, ग्राहकांना सहा महिने किंवा १२ महिन्यांचा प्लॅन निवडावा लागणार आहे. जिओ पोस्ट पेड ब्रॉडबँडचा वार्षिक प्लॅन कमीत कमी मासिक ३९९ रुपयांचा असणार आहे.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेकरिता दिलासा! मे महिन्यात निर्यातीत ६९.३५ टक्क्यांची वाढ

ज्या ग्राहकांना प्लॅनपेक्षा अधिक प्लॅन किंवा मनोरंजन सेवा घेण्यासाठी परतावा होऊ शकणारी १ हजार रक्कम भरावी लागणार आहे. रिलायन्स जिओ ही ब्रॉडबँड बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे.

जिओफायबरचा बाजारात मोठा हिस्सा

कंपनीचा बाजारात सर्वात मोठा ५४.५६ टक्के हिस्सा आहे. तर देशातील वायरलाईन ब्रॉडबँडमध्ये जिओचा तिसरा क्रमांक आहे. वायरलाईन ब्रॉडबँडमध्ये जिओचा १५.६ टक्के हिस्सा आहे. तर कंपनीचे एकूण ३१ लाख ग्राहक आहेत.

हेही वाचा-नाशिक : पाकच्या कांद्याने केला भारतीय कांद्याचा 'वांदा'; निर्यातीत 70 टक्के घट

जिओ ठरला जगात पाचवा मजबूत ब्रँड

अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओ ही जगातील सर्वात पाचवा मजबूत ब्रँड ठरली आहे. जिओपूर्वी फेरारी आणि कोका-कोला या कंपन्यांचा ब्रँडमध्ये वरचा क्रमांक आहे. ब्रँड फायनान्स ही जगभरातील कंपन्यांच्या ब्रँडचे मूल्यांकन सर्वात आघाडीची कन्सल्टन्सी संस्था आहे. या संस्थेने 'ब्रँड फायनान्स ग्लोबल ५००' या जगातील सर्वाधिक मजबूत ब्रँडची यादी जाहीर केली आहे. यामध्ये वूईचॅट सर्वात आघाडीवर असल्याचे वार्षिक अहवालातून समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details