नवी दिल्ली – टाळेबंदी आणि कोरोनाच्या संकटातही रिलायन्स जिओची गुंतवणुकीत यशस्वी घौडदौड सुरू आहे. सौदी अरेबियाची मालकी असलेला सार्वभौम संपत्ती निधी (पीआयएफ) ही संस्था जिओमध्ये 25 टक्के गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे. पीआयएफ रिलायन्स जिओमध्ये 1.5 अब्ज डॉलर किमतीचा 2.33 टक्के हिस्सा घेणार आहे.
रिलायन्समधील हिस्सा खरेदीनंतर जिओच्या संचालक मंडळावर पीआयएफयेणार आहे. त्यासाठी रिलायन्सकडून 25 टक्के हिश्श्याची पीआयएफला विक्री करण्यात येणार आहे. नुकतेच जिओमध्ये अबुधाबीमधील मुबादाला कंपनीने 1.2 अब्ज डॉलरचा हिस्सा आणि एडीआयएने 750 दशलक्ष डॉलरचा हिस्सा खरेदी केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. गेल्या काही महिन्यांत जगभरातील आठ कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये फेसबुक, केकेआर आणि सिल्व्हर लक कॅपिटल या कंपन्यांचा समावेश आहे.