नवी दिल्ली - रिलायन्स जिओने ग्राहकांना पैसे कमविण्यासाठी खास ऑफर आणली आहे. दुसऱ्यांचे रिचार्ज केले तर ग्राहकांना ४ टक्के कमिशन मिळणार आहे.
रिचार्ज करणाऱ्यांना कमिशन मिळवून देण्यासाठी रिलायन्स जिओने जिओपीओएस लाईट अॅप लाँच केले आहे. यामधून ग्राहकांना इतरांचे रिचार्ज करता येणार आहे. या अॅपसाठी १ हजार रुपये ग्राहकांना भरावे लागतात. मात्र, सुरुवातीच्या काळात हे शुल्क माफ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. सुरुवातीला ग्राहकांना किमान १ हजार रुपयांचा बॅलन्स करावा लागणार आहेत. त्यानंतर किमान २०० रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. टाळेबंदीत दुकाने बंद असल्याने अनेकांना रिचार्ज करणे शक्य होत नाही. त्यांना अॅपचा फायदा होणार आहे.