नवी दिल्ली - रिलायन्स जिओने रिचार्जच्या वाढीव किमतीचे नवे प्लॅन जाहीर केले आहेत. यामध्ये पूर्वीच्या दरात ३९ टक्के वाढ करण्यात आली आहेत. नवे इंटरनेट मोबाईल आणि कॉलिंगचे रिचार्ज इतर कंपन्यांहून २५ टक्के स्वस्त असल्याचा जिओने दावा केला आहे.
जिओचा असा आहे नवा प्लॅन, ३९ टक्के वाढल्या किंमती - Telecom operators
जिओ ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता असलेल्या प्लॅनसाठी ३९९ रुपये द्यावे लागत होते. यापुढे ३९ टक्क्यांची वाढ झाल्याने ग्राहकांना ५५५ रुपये द्यावे लागणार आहेत.
नुकतेच व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलनेही रिचार्जचे दर वाढविले आहेत. त्यानंतर जिओनेही दर वाढविले आहेत.
असा आहे जिओचा नवा प्लॅन
जिओ ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता असलेल्या प्लॅनसाठी ३९९ रुपये द्यावे लागत होते. यापुढे ३९ टक्क्यांची वाढ झाल्याने ग्राहकांना ५५५ रुपये द्यावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना पूर्वी एवढाच १.५ जीबीचा रोज डाटा मिळणार आहे. ग्राहकांना १ हजार ६९९ रुपयांच्या प्लॅनसाठी २ हजार १९९ रुपये द्यावे लागणार आहेत. जिओच्या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये साधारणत: महिनाभर रोज १.५ जीबीचा डाटा दिला जातो. हा प्लॅन इतर कंपन्यांच्या तुलनेत २५ टक्क्यांनी स्वस्त आहे.