महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जिओच्या 'या' ग्राहकांना मिळणार 'ॲमेझॉन प्राईम'चे मोफत सदस्यत्व - Latest jio news

जे जिओ फायबरचे ग्राहक गोल्ड अथवा त्याहून अधिक किमतीचा प्लॅन घेतील त्यांना ही ऑफर मिळणार आहे. ग्राहकांनी यापूर्वी गोल्ड अथवा त्याहून अधिक किमतीचा प्लॅन असल्यास त्यांनाही अॅमेझॉनचे सदस्यत्व मोफत देण्यात येणार आहे.

Jio
जिओ

By

Published : Jun 12, 2020, 4:25 PM IST

हैदराबाद- रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. जिओ फायबर वापरकर्त्यांना एक वर्षाचे ॲमेझॉन प्राईमचे सदस्यत्व मोफत मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकाचे 999 रुपये वाचणार आहे.

जे जिओ फायबरचे ग्राहक गोल्ड अथवा त्याहून अधिक किमतीचा प्लॅन घेतील त्यांना ही ऑफर मिळणार आहे. ग्राहकांनी यापूर्वी गोल्ड अथवा त्याहून अधिक किमतीचा प्लॅन असल्यास त्यांनाही अॅमेझॉनचे सदस्यत्व मोफत देण्यात येणार आहे.

ग्राहकांकडे सिल्वर आणि ब्राऊनचा प्लॅन असल्यास ते रिचार्ज अपग्रेड करू शकतात. रिचार्ज अपग्रेड झाल्यानंतर ही ऑफर मिळवू शकतात

असे मिळवा ॲमेझॉन प्राईमचे सदस्यत्व:

  • जिओ फायबरच्या वापरकर्त्यांना रिचार्ज करून गोल्ड किंवा त्याहून किमतीचा प्लॅन सक्रिय करावा लागणार आहे
  • माय जिओ ॲप किंवा जिओ डॉट कॉम चा वापर करून
  • ही ग्राहक जिओ फायबर अकाउंट सक्रिय करू शकतात
  • साईट अथवा ॲपवरील एक वर्षाचे ॲमेझॉनचे सदस्यत्व या पर्यायावर क्लिक करूनही सेवेचा लाभ घेऊ शकतात.

ॲमेझॉन प्राईमचे सदस्यत्व घेतल्यानंतर जिओ फायबर वापरकर्त्यांना गुलाबो सिताबो या चित्रपटाचे प्रीमियरही पाहता येणार आहे त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही

ग्राहकांना हेदेखील लाभ मिळणार

  • ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ( हिंदी,इंग्रजी, मराठी, तमिळ, मल्याळम, गुजराती, तेलुगू, कन्नड, पंजाबी आणि बंगाली)
  • उत्पादनांची डिलिव्हरी लवकरात लवकर घरपोच मिळणार
  • ऑनलाईन शॉपिंग करताना ऑफर्स देताना प्राधान्य देण्यात येणार
  • जाहिरातीविना ॲमेझॉन प्राईम म्युझिक चा आनंद घेता येणार
  • प्राईम गेमिंग
  • प्राईम रीडिंग

ABOUT THE AUTHOR

...view details