नवी दिल्ली - जेट एअरवेज कंपनीने १६०० वैमानिकांच्या वेतन थकविले आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या वैमानिकांचे वेतन व्याजासह मिळावे,यासाठी सरकारने मदत करण्याची विनंती नॅशनल एविटर्स गिल्डने (एनएजी) केली आहे. नॅशनल एविटर्स गिल्डने ही वैमानिकांची संघटना आहे.
जेट एअरवेजचे प्रशासन वैमानिकांच्या प्रश्नाबाबत बहिरे झाल्याची तक्रार एनएजीने केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोश गंगवार यांना पत्र लिहून केली आहे.
वैमानिक हे अत्यंत तणाव आणि नैराश्यावस्थेत असल्याचे एनएजीचे जनरल सेक्रेटरी तेज सूड यांनी पत्रात म्हटले आहे. दर महिन्याला शाळा,कॉलेज,वैद्यकीय खर्च आणि वृद्ध आई-वडिलांचा खर्च करणे अशक्य झाल्याचेही संघटनेने म्हटले आहे.