मुंबई - टाळेबंदीपासून भारतीय आयटी उद्योगातील नोकरी भरतीच्या प्रमाणात वाढ सुरुच आहे. आयटी उद्योगामधील नोकरी भरतीच्या पोस्टचे प्रमाण जानेवारीमध्ये ३९ टक्क्यांनी वाढल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
आयटी क्षेत्रानंतर बीपीओ (१० टक्के) आणि बँकिंग (६ टक्के) असे नोकरी भरतीचे प्रमाण वाढल्याचे जॉब साईट एससीआयकेईवायने म्हटले आहे. महानगरांमध्ये नोकऱ्यांच्या पोस्ट करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये बंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे. या शहरांचा नोकऱ्यांच्या पोस्टमध्ये जानेवारी २०२१ मध्ये ५० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. हा अहवाल एससीआयकेईवाय मार्केट नेटवर्कने १५ हजार नोकऱ्यांविषयक पोस्टचे विश्लेषण करून अहवाल तयार केला आहे.
हेही वाचा-व्यापाऱ्याच्या नव्या संधी; भारत-मॉरिशसमध्ये मुक्त व्यापार करार
काय म्हटले आहे अहवालामध्ये?
- बंगळुरू आणि हैदराबादमधील कंपन्यांकडून आयटी नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे वार्षिक २५ लाख व त्याहून अधिक पॅकेज दिले जात आहे.
- ६ लाख ते १५ लाखापर्यंतच्या वेतनात बंगळुरुचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.
- आयटी क्षेत्रात प्रकल्प व्यवस्थापकाची ४७ टक्के, तर बांधकाम क्षेत्रात ६ टक्के, बँकिंग क्षेत्रात ४ टक्के व नोकरी भरतीमध्ये ३ टक्के अशी मागणी आहे.
- डिजीटल मार्केटिंगला ३० टक्के मागणी आहे.
- कोरोना महामारीच्या काळातही आयटी क्षेत्राने नोकऱ्यांमध्ये असाधारण प्रगती केली आहे. आयटी व्यावसायिक हे डिजीटल परिवर्तन घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावित आहेत.
हेही वाचा-वैयक्तिक गोपनीयतेकरता जागतिक पातळीवर नियम व्हावेत- सत्या नाडेला
असे असले तरी अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीचे क्षेत्र वाढविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. जर त्यामध्ये सुधारणा झाली तर गमाविलेल्या नोकऱ्यांमध्ये सुधारणा होईल, असे एससीआयकेईवायचे सहसंस्थापक अक्षय शर्मा यांनी म्हटले आहे.