बंगळुरू - अर्थव्यवस्था असताना माहिती तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या (आयटी) कंपन्यांमधील ३० ते ४० हजार नोकऱ्या कमी होण्याची शक्यता तंत्रज्ञानातील गुंतवणूकदार टी. व्ही. मोहनदास पै यांनी व्यक्त केली. या नोकऱ्या मध्यम पातळीवरील असतील, असेही त्यांनी सांगितले.
इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळलेल्या टी. व्ही. मोहनदास पै यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना आयटी क्षेत्राबाबतमत व्यक्त केले. ते म्हणाले,
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र विकसित होताना पाच वर्षातून एकदा नोकऱ्या कमी होतात. जे कर्मचारी वेतनाप्रमाणे कंपनीमध्ये मोलाची भर घालत नाहीत, अशा सर्वच क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांच्या पाश्चिमात्य देशामध्ये नोकऱ्या कमी होतात. जेव्हा कंपनीची प्रगती होते, तेव्हा पदोन्नती होते. मात्र, मंदी असताना ज्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगारी आहेत, त्याबाबत कंपनी विचार करतात. जर तुमची कामगिरी करत नाहीत, तर तुम्हाला कोणी गलेलठ्ठ पगार देत नाही. तुम्हाला अधिक चांगले द्यावे लागते, असे पै यांनी सांगितले.