महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

प्रवर्तकांमधील वादाचा विमान कंपनीशी संबंध नाही, इंडिगोच्या सीईओंचे स्पष्टीकरण - इंडिगो

कंपनी व्यवस्थित सुरू असल्याचे इंडिगोचे सीईओ रोन्जॉय दत्ता यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

इंडिगो

By

Published : Jul 10, 2019, 7:53 PM IST

नवी दिल्ली - इंडिगो एअरलाईन्सच्या दोन प्रवर्तकामधील वाद चव्हाट्यावर आला होता. या वादाचा एअरलाईन्सशी संबंध नसल्याचे इंडिगो एअरलाईनचे सीईओ यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दोन्ही प्रवर्तकामधील वादाचा निपटारा करण्यात येईल. मात्र त्याचा विमान कंपनीशी कोणताही संबंध नाही. ही कंपनी व्यवस्थित सुरू असल्याचे इंडिगोचे सीईओ रोन्जॉय दत्ता यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पुढे त्यांनी पत्रात म्हटले, कंपनीचे उद्दिष्ट, दिशा आणि विकासाची रणनीती बदलली नाही. खरोखरच आमच्यासाठी काहीही बदलले नाही. मी उत्कृष्ट क्षमतेने नोकरी करण्यासाठी जात आहे. तुम्ही तसेच करणार आहात, अशी माझी अपेक्षा आहे. वेळेवर काम करण्याच्या आपल्या वचनासाठी तुम्ही देत असलेले योगदान आणि प्रयत्नाबद्दल धन्यवाद. सौजन्य आणि त्रासाविना अनुभव!


काय आहे प्रवर्तकामधील वाद-
इंडिगोचे प्रवर्तक राकेश गंगवाल यांनी मंगळवारी सहसंस्थापक राहुल भाटिया यांच्यावर टीका केली होती. तर भाटिया यांनी गंगवाल यांच्या अवाजवी मागण्या केला जात असल्याचे म्हटले होते. जवळपास वर्षभर वाद सुरू राहिल्यानंतर सेबीने ह्स्तक्षेप करावा, अशी गंगवाल यांनी नुकतेच मागणी केली आहे. कंपनी मुलभूत तत्वापासून वळत असल्याचाही त्यांनी दावा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details