महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एकवेळ वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिक वापराबाबत गोंधळ! - BC Bhartiy

मोठ्या उत्पादकांकडून व्यापाऱ्यांना एकवेळ वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिकची सक्ती केली जाते. जर प्लास्टिक वापराबाबत गोंधळ दूर झाला नाही तर अंमलबजावणीत अडथळा येईल, असे सीएआयटीने म्हटले आहे.

संग्रहित -प्लास्टिक कॅरीबॅग

By

Published : Sep 15, 2019, 6:26 PM IST

नवी दिल्ली - एकवेळ वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिकबाबतचा गोंधळ दूर करा, अशी विनंती व्यापारी संघटना सीएआयटीने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना केली. प्लास्टिकच्या वापराबाबत स्पष्ट मार्गदर्शन करणाऱ्या सूचना द्याव्यात, असे सीएआयटीने म्हटले आहे.


मोठ्या उत्पादकांकडून व्यापाऱ्यांना एकवेळ वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिकची सक्ती केली जाते. जर प्लास्टिक वापराबाबत गोंधळ दूर झाला नाही तर अंमलबजावणीत अडथळा येईल, असे सीएआयटीने म्हटले आहे.

हेही वाचा-एसबीआयच्या शाखेचे लडाखमध्ये १० हजार फूट उंचीवरील गावात उद्घाटन

५० मायक्रॉनचा वापर करण्याला परवानगी आहे की नाही, हे स्पष्ट नसल्याचे सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भारतीय यांनी म्हटले. एकवेळ वापर होऊ शकणारे ९८ टक्के प्लास्टिक हे बहुराष्ट्रीय कंपन्या, उत्पादक कंपन्या आणि मोठे विक्रेते यांच्याकडून वापरले जाते. या मोठ्या कंपन्यांना प्लास्टिक वापराबाबत विचारणा व्हावी, असे संघटनेने म्हटले आहे.

हेही वाचा-'कोळसा खाण कामगारांचा संप रोखण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक ठरणार'

एकवेळ वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर बंद झाल्यास काही जणांचे रोजगार हिरावून घेतले जाणार आहेत. त्यांच्यासाठी पर्याय सरकारने द्यावा, अशीही संघटनेने मागणी केली आहे. एकवेळ वापर होवू शकणाऱ्या प्लास्टिकवर बंदी आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सीएआयटीने यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. त्यासाठी संघटनेने जनजागृती करण्यासाठी १ सप्टेंबरपासून देशभरात मोहिम सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details