महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

इन्फोसिस २०२२ पर्यंत १२ हजार अमेरिकन लोकांना देणार नोकऱ्या - इन्फोसिस न्यूज

येत्या पाच वर्षात अमेरिकेत २५ हजारापर्यंत मनुष्यबळ करणार असल्याचा निर्णय बंगळुरूमध्ये मुख्यालय असलेल्या इन्फोसिसने घेतला आहे. इन्फोसिसने २०१७ मध्ये दोन वर्षात १० हजार अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या देणार असल्याची वचनबद्धता जाहीर केली होती.

संग्रहित- इन्फोसिस
संग्रहित- इन्फोसिस

By

Published : Sep 2, 2020, 3:27 PM IST

बंगळुरू- महासत्ता असलेल्या अमेरिकेत भारतीय कंपनी नोकऱ्या देणार आहे. इन्फोसिस कंपनी २०२२ पर्यंत १२ हजार अमेरिकन लोकांना नोकऱ्या देणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले आहे.

येत्या पाच वर्षात अमेरिकेत २५ हजारापर्यंत मनुष्यबळ करणार असल्याचा निर्णय बंगळुरूमध्ये मुख्यालय असलेल्या इन्फोसिसने घेतला आहे. इन्फोसिसने २०१७ मध्ये दोन वर्षात १० हजार अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या देणार असल्याचे वचनबद्धता जाहीर केली होती. प्रत्यक्षात कंपनीने १३ हजारांहून अधिक अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या दिल्या आहेत.

हेही वाचा-बँका कर्जाची पुनर्रचना करण्यास मुक्त; मात्र कर्जदारांना दंड आकारता येणार नाहीत

इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार म्हणाले, की कोरोना महामारीचा जगभरात परिणाम झाला आहे. अशा स्थितीत आम्ही अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या देण्यासाठी वचनबद्धता जाहीर केली आहे. इन्फोसिसला मिळणाऱ्या निर्यात महसुलापैकी ६० टक्के अधिक उत्पन्न हे नॉर्थ अमेरिकेतून मिळते. या नॉर्थ अमेरिकेतील विद्यापीठातून पदवी घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्यांची संधी देण्यात येणार आहे. तसेच कला महाविद्यालय आणि कम्युनिटी महाविद्यालयांमधील मनुष्यबळ हे उत्कृष्ट असणार असल्याचेही रवी कुमार यांनी सांगितले.

कंपनीने प्रशिक्षण आणि पुनर्प्रशिक्षणासाठी कार्यक्रम सुरू करण्यासाठी भागीदारांबरोबर नियोजन केले आहे. त्यामधून २१ व्या शतकासाठी लागणाऱ्या करियरसाठी कर्मचारी तयार करण्यात येणार आहेत. गेल्या तीन वर्षांत इन्फोसिसने सहा तंत्रज्ञान आणि नवसंशोधन केंद्र इंडियाना, नॉर्थ कॅरोलिना, कनेक्टीकट, र्होड इसलँड, टेक्सा आणि एरिझोना राज्यात सुरू केले आहेत.

हेही वाचा-एजीआरच्या निकालानंतर व्होडाफोनच्या शेअरमध्ये १३ टक्क्यांची घसरण

ABOUT THE AUTHOR

...view details