महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जागतिक प्रतिष्ठित कंपन्यांच्या यादीत इन्फोसिस तिसऱ्या क्रमांकावर, इतर १६ कंपन्यांचाही समावेश - TCS

इन्फोसिसने थेट ३१ व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारतीय कंपन्यांनी जागतिक प्रतिष्ठित कंपन्यांच्या यादीत महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

संग्रहित - इन्फोसिस

By

Published : Sep 25, 2019, 1:12 PM IST

नवी दिल्ली- फोर्ब्सच्या जागतिक प्रतिष्ठित कंपन्यांच्या यादीत भारतीय कंपन्यांनी यशाची मोहोर उमटविली आहे. या यादीत १७ भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. तर संपूर्ण यादीत तिसऱ्या क्रमांकावर इन्फोसिस आहे. जागतिक देयक (पेमेंट) कंपनी व्हिसा पहिल्या क्रमांकावर तर दुसऱ्या क्रमांकावर इटली फेरारी कार उत्पादक कंपनी आहे.

इन्फोसिसने थेट ३१ व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

या आहेत पहिल्या दहा प्रतिष्ठित कंपन्या

  1. नेटफ्लिक्स (४था क्रमांक)
  2. पेपल (५वा क्रमांक)
  3. मायक्रोसॉफ्ट(६वा क्रमांक)
  4. वॉल्ट डिस्ने (सातवा क्रमांक)
  5. टोयोटा मोटोर (८)
  6. मास्टरकार्ड (९)
  7. कोस्टको व्होलसेल (१०)

हेही वाचा-सणाच्या मोठ्या सेलकरिता फ्लिपकार्टची लगबग; ५० हजार जणांना देणार थेट रोजगार

भारताची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (२२ व्या क्रमांकावर) तर टाटा मोटर्स (३१ व्या क्रमांकावर) आहे. फोर्ब्सच्या यादीत टाटा स्टील (१०५), लार्सन अँड टुर्बो (११५), महिंद्रा अँड महिंद्रा (११७), एचडीएफसी (१३५), बजाज फिन्सरी (१४३), पिरामल एन्टरप्रायजेस (१४९), स्टील ऑथोरेटी ऑफ इंडिया (१५३), एचसीएल टेक्नॉलॉजीस (१५५), हिंदाल्को इंडस्ट्रीज (१५७), विप्रो (१६८), एचडीएफसी बँक (२०४), सन फार्मा इंडस्ट्रीज (२१७), जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (२२४), आयटीसी (२३१) एशियन पेंट्स (२४८)

प्रतिष्ठित २५० कंपन्यांमध्ये अमेरिकेच्या ५९ कंपन्यांचा समावेश आहे. तर जास्तीत जास्त कंपन्यांचा यादीमध्ये समावेश असलेल्या यादीत जपान दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर चीन तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या ६३ वर्षात प्रथमच जपान, चीन आणि भारताच्या कंपन्यांची संख्या ८२ झाली आहे. विशेष म्हणजे २५० प्रतिष्ठित कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या या आशियामधील आहेत. एकूणच आशियाचे फोर्ब्सच्या प्रतिष्ठित कंपन्यांच्या यादीवर वर्चस्व झाले आहे.

फोर्ब्सने स्टॅटिस्टाबरोबर भागीदारी करत फोर्ब्सने जगातील सर्वात मोठ्या २ हजार कंपन्यांची यादी तयार केली आहेत. सामाजिक वहन (सोशल कंडक्ट), विश्वासहर्ता, उत्पादनांचे सामर्थ्य आणि सेवा, तसेच कर्मचाऱ्यांना दिली जाणारी वागणूक या निकषावर प्रतिष्ठित कंपन्यांची यादी तयार केली आहे. स्टॅटिस्टाने ५० हून अधिक देशात सर्व्हे केला.

ABOUT THE AUTHOR

...view details