महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

इन्फोसिसच्या स्वतंत्र संचालकपदी किरण मुझुमदार शॉ यांची फेरनिवड

बिकॉनची उभारणी करण्याबाबत त्यांची क्षमता, यश आणि योगदान याबाबत एसईएसला शंका नाही. त्यांचे नेतृत्व कौशल्यदेखील कौतुकास्पद आहे. मात्र जेव्हा त्या इन्फोसिसच्या संचालक मंडळावर येतात, तेव्हा दुर्दैवाने त्या पद्धतीने शॉ यांचा इन्फोसिसला आधार वाटत नाहीत, असे एसईएसने म्हटले आहे.

संग्रहित

By

Published : Mar 18, 2019, 7:32 PM IST


नवी दिल्ली- इन्फोसिसच्या स्वतंत्र संचालकपदी किरण मुझुमदार-शॉ यांची फेरनिवड झाली आहे. इन्फोसिसच्या समभागधारकांनी बहुमतांनी त्यांची निवड केली आहे.

स्टेकहोल्डर्स एम्पावरमेंट सर्व्हिसेसने (एसईएस) स्वतंत्र संचालक म्हणून शॉ यांची भूमिका आणि त्यांच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.बिकॉनची उभारणी करण्याबाबत त्यांची क्षमता, यश आणि योगदान याबाबत एसईएसला शंका नाही. त्यांचे नेतृत्व कौशल्यदेखील कौतुकास्पद आहे. मात्र जेव्हा त्या इन्फोसिसच्या संचालक मंडळावर येतात, तेव्हा दुर्दैवाने त्या पद्धतीने शॉ यांचा इन्फोसिसलाआधार वाटत नाहीत, असे एसईएसने म्हटले आहे.

अशी झाली मतांची टक्केवारी-

इन्फोसिसने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार एकूण ९२.२ टक्के पोस्टल मते ही किरण मुझुमदार-शॉ यांना मिळाली आहेत. तर ७.७ टक्के मते ही मुझुमदार-शॉ यांच्याविरोधात पडली आहेत. तर सार्वजनिक संस्थेच्या वर्गवारीत ९३.५७ टक्के मते शॉ यांच्या बाजुने पडली आहेत. तर ६.४ टक्के मते ही शॉ यांच्या नियुक्तीला विरोध करणारी आहेत.

प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुपच्या वर्गवारीत १०० टक्के मते शॉ यांची फेरनिवड करण्यासाठी अनुकूल आहेत. तर बिगर सार्वजनिक संस्थेच्या वर्गवारीत ८१ टक्के मते ही शॉ यांना अनुकूल तर १८.८ टक्के मते ही प्रतिकूल पडली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details