मुंबई - इंडसइंड बँकेने कोरोनाच्या लढाईत मदत करण्यासाठी ३० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देण्याकरता बँकेने राज्य व केंद्र सरकारबरोबर काम करत असल्याचे म्हटले आहे.
इंडसइंड बँकेने यापूर्वीच मास्क, सॅनिटायझर आणि हातमोजे यांच्यासाठी मदत केली आहे. अनेक कॉर्पोरेट आणि बँकांनी सरकारला मदत केल्याचे जाहीर केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पीपीई उपलब्ध करून देण्यावरही इंडसइंड बँकेकडून काम करण्यात येत आहे.