नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात टाळेबंदी असताना इंडिगोने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. कंपनीकडून चीनसह मलेशिया व देशांतर्गत मालवाहू विमान वाहतूक सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
सूत्राच्या माहितीनुसार इंडिगो हे चीन, सिंगापूर आणि मलेशियामध्ये मालवाहू विमान वाहतूक सुरू करणार आहे. वैद्यकीय साधनांसह इतर जीवनावश्यक वस्तुंसाठी बहुतांश मालवाहू विमान वाहतूक मोफत करण्यात येणार आहे. विमान कंपनीचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर विल्यम बाउल्टर म्हणाले, की प्रवासी विमान वाहतूक बंद झाली आहे. अशावेळी मालवाहू विमान वाहतूक आमच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आम्ही देशासह विदेशात वैद्यकीय साधनांची मालवाहतूक केली आहे.