चेन्नई - इंडियन बँकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कॅनरा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. मृत्यू झालेल्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना इंडियन बँकेने नोकरी दिली आहे.
इंडियन बँकेच्या सीईओ पद्मजा छुंद्रू म्हणाल्या, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दुर्दैवाने बँकेच्या ११४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी कुटुंबांतील १०२ जणांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती केली आहे.
दरम्यान, इंडिया बँकेने मार्च तिमाही अखेर १,७०८.८५ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. ही माहिती इंडियन बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये मार्च तिमाही अखेर इंडियन बँकेला २१७.७४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.