नवी दिल्ली - सौदी अरॅम्को कंपनीने जगातील सर्वात मोठ्या आयपीओची माहिती पुस्तिका (प्रॉस्पेक्टस) जाहीर केले. कंपनीचे मूल्यांकन अंदाजे हे १.२ ते २.३ लाख कोटी रुपये आहे. या कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज ऑईल आणि केमिकलममधील २० टक्के हिस्सा विकत घेतला आहे.
अरॅम्कोने सौदी अरेबियाच्या शेअर बाजारात आयपीओ खरेदी करण्यासाठी ६५८ पानी माहिती पुस्तिका (प्रॉस्पेक्ट्स) रविवारी लाँच केली आहे. कंपनीने आशियामधील बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी प्रवेश केला आहे. कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज ऑईल आणि केमिकलचे २० टक्के शेअर हे १२ ऑगस्ट २०१९ ला खरेदी केल्याचे माहिती पुस्तिकेत म्हटले आहे. वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेत विस्तार करणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-दिवाळीतही वाहन उद्योगावर मंदीचा प्रभाव; ऑक्टोबरमध्ये विक्रीत १२.७६ टक्के घसरण