मुंबई - बाजार नियामक संस्था सेबीने इक्रा आणि केअर या पतमानांकन संस्थेला प्रत्येकी २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयएल अँड एफएसची बिघडत जाणारी आर्थिक स्थिती ओळखण्यात पतमानांकन संस्थांना अपयश आल्याचा सेबीने ठपका ठेवला आहे.
इक्रा आणि केअर या दोन्ही संस्थांना ४५ दिवसात दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. प्रकरणातील सर्व वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहिल्यानंत रसेबी कायद्यानुसार दंड ठोठावल्याचे सेबीचे अधिकारी संतोष शुक्ला यांनी म्हटले आहे.