नवी दिल्ली- आर्थिक संकटात सापडलेल्या आयएल अँड एफएसने गुजरात उर्जा विकास निगमविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद प्राधिकरणात (एनसीएलएटी) धाव घेतली आहे. उर्जा विकास निगमने आयएल अँड एफएसचे १४५ कोटी रुपये थकविले आहेत.
एनसीएलएटीच्या द्विसदस्यीय खंडपीठाचे अध्यक्ष न्यायाधीश एस. जे. मुखोपध्याय यांनी आयएल अँड एफएसच्या याचिकेप्रकरणी गुजरात उर्जा विकास निगमला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी एनसीएलएटीकडून पुढील सुनावणी १५ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.
हेही वाचा-शेअर बाजाराचा निर्देशांक ४०० अंशाने वधारला; जागतिक आर्थिक मंचावरील सकारात्मक स्थितीचा परिणाम
वरिष्ठ वकील रामजी श्रीनिवासन यांनी आयएल अँड एफएसची बाजू एनसीएलटीमध्ये बाजू मांडली. आयएल अँड एफएसला थकीत रकमेविषयी उर्जा नियामक आयोगाकडे दाद मागुनही दिलासा मिळाला नव्हता. आयएल अँड एफएस ग्रुपवर ९० हजार कोटींहून अधिक कर्ज आहे. सध्या, हे कर्ज फेडण्यासाठी कंपनीकडून नियोजन करण्यात येत आहे. ही कर्ज फेडण्याची प्रक्रिया दिवाळखोरी व नादारीच्या नियमानुसार करण्यात येत आहे.
हेही वाचा-एमएमआरडीएला पायाभूत क्षेत्रात १ लाख कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा