महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कॅनरा बँकेतील विलिनीकरणानंतर सिंडिकेट बँकेच्या शाखांचे बदलणार आयएफसी कोड - सिंडिकेट बँक आयएफसी कोड

ज्या ग्राहकांचे सिडिंकेट बँकेत खाते होते, त्यांना बँकेच्या शाखांकरिता नवीन आयएफसी कोड हे कॅनरा बँकेच्या वेबसाईटवरून मिळू शकतात. तसेच सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवीन चेकबुक मिळणार आहेत.

canara bank
कॅनरा बँक

By

Published : Jun 11, 2021, 3:11 PM IST

बंगळुरू- पुर्वीच्या सिंडिकेट बँकेच्या शाखांचे आयएफसी कोड १ जुलै २०२१ पासून बदलण्यात येणार असल्याची माहिती कॅनरा बँकेने दिली आहे. ग्राहकांना एनईएफटी, आरटीजीसी, आयएमपीएसवरून पैसे मिळविण्यासाठी कॅनरा हा आयएफएसी कोड वापरावा लागणार आहे.

ज्या ग्राहकांचे सिडिंकेट बँकेत खाते होते, त्यांना बँकेच्या शाखांकरिता नवीन आयएफसी कोड हे कॅनरा बँकेच्या वेबसाईटवरून मिळू शकतात. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवीन चेकबुक मिळणार आहेत. पुर्वीच्या सिडिंकेट बँकेसाठी विदेशी चलनातून अर्थव्यवहार करण्यासाठी वापरण्यात येणारा स्विफ्ट कोड हा १ जुलै २०२१ पासून बंद होणार आहे.

सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलिनीकरण-

कॅनरा बँकेने सर्व ग्राहकांना विदेशी चलनातून अर्थव्यवहार करण्यासाठी CNRBINBBFD हा स्विफ्ट कोड वापरण्याचा सल्ला दिला आहे. सिंडिकेट बँकेचे एप्रिल २०२० मध्ये कॅनरा बँकेत विलिनीकरण झाले आहे. त्यानंतर कॅनरा बँक ही देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे.

हेही वाचा-एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्क १ जानेवारीपासून वाढणार

कॅनरा सुरक्षा वैयक्तिक कर्ज योजना जाहीर-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात भरमसाठ पैसे खर्च करावे लागत आहेत. तर कित्येकांना आर्थिक परिस्थिती नसल्याने उपचार घेण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत कॅनरा बँकेने 'कॅनरा सुरक्षा वैयक्तिक कर्ज योजना' जाहीर केली आहे.

हेही वाचा-एलपीजी ग्राहक विनाशुल्क बदलू शकतात वितरक, जाणून घ्या, प्रक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details