महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कर्जदारांना दिलासा ! आयसीआयसीआयकडून कर्जाच्या व्याजदरात कपात - ICICI Bank cuts lending rates

आयसीआयसीआयने कर्जाचे व्याजदर कमी केल्याने एमसीएलआरशी संलग्न असलेल्या कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.

संग्रहित-
संग्रहित-

By

Published : Aug 3, 2020, 7:22 PM IST

मुंबई- आयसीआयसीआय बँकेच्या कर्जदारासाठी दिलासादायक बातमी आहे. आयसीआयसीआयने एमसीएलआरशी संलग्न असलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात 10 बेसिस पाँईटने कपात केली आहे. हे कर्जाचे कमी झालेले व्याजदर हे 1 ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

आयसीआयसीआयने कर्जाचे व्याजदर कमी केल्याने एमसीएलआरशी संलग्न असलेल्या कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.

असे असणार आहेत कर्जाचे व्याजदर-

  • आयसीआयसीआय बँकेचे एक वर्षासाठी एमसीएलआरसाठी 7.45 टक्के व्याजदर आहे.
  • सहा महिन्यांच्या कर्जासाठी 7.40 टक्के व्याजदर आहे.
  • एमसीएलआर एका महिन्यासाठी 7.20 टक्के आहे. तर तीन महिन्यांसाठी 7.25 टक्के व्याजदर आहे.
  • बँकांकडून दर महिन्याला एमसीएलआरच्या व्याजदराचा आढावा घेण्यात येतो.

जाणून घ्या, काय आहे एमसीएलआर-
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेडिंग रेट्स (एमसीएलआर) ही भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेली पद्धत आहे. याचा वापर करून वाणिज्य बँकांकडून देण्यात येणारे कर्जाचे व्याज ठरविले जातात. याचा वापर बँकांकडून नोटाबंदीनंतर सुरू करण्यात आला. एमसीएलआरच्या अंमलबजावणीच्या ग्राहकांना फायदा होतो. कारण आरबीआयकडून रेपो दरात कपात झाल्यानंतर बँकांना कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतात.

ABOUT THE AUTHOR

...view details