महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अखेर ह्युदांई मोटार इंडियाही वाढविणार वाहनांच्या किंमती - HMIL

वाहनांच्या वाढणाऱ्या किंमती या मॉडेल आणि इंधनाच्या प्रकारावरून भिन्न असतील, असे ह्युदांई मोटार इंडिया (एचएमआयएल) कंपनीने म्हटले आहे. कंपनीने मॉडेलनिहाय किंमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.

Hyundai
ह्युदांई मोटार इंडिया

By

Published : Dec 10, 2019, 5:18 PM IST

नवी दिल्ली- ह्युदांई मोटार इंडियानेही अखेर सर्व वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून ह्युदांई वाहनांच्या किमती वाढणार आहेत. यापूर्वी ह्युंदाईने जानेवारीपासून किमती वाढविणार नसल्याचे म्हटले होते.

वाहनांच्या वाढणाऱ्या किमती या मॉडेल आणि इंधनाच्या प्रकारावरून भिन्न असतील, असे ह्युदांई मोटार इंडिया (एचएमआयएल) कंपनीने म्हटले आहे. कंपनीने मॉडेलनिहाय किमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. उत्पादन खर्चासह कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे वाहनांच्या किमती वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. पुढील महिन्यात कंपनीकडून वाहनांच्या किमती जाहीर होणार आहेत.

हेही वाचा-हिरो मोटोकॉर्पच्या वाहनांच्या किमती जानेवारीत २ हजार रुपयापर्यंत वाढणार

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या किमती जानेवारीपासून वाढणार आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने वाहनांच्या किमती वाढविण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. टोयोटा, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मर्सिडिज बेन्झही वाहनांच्या किमती वाढविणार आहे.

हेही वाचा-प्रवासी वाहनांच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये अंशत: घसरण

ABOUT THE AUTHOR

...view details