चेन्नई - टाळेबंदीत वाहन उद्योगाला मोठा फटका बसला असताना ह्युदांई मोटारने ५ हजार कारची निर्यात केली आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात उत्पादन सुरू झाल्यावरच एका महिन्यात ही निर्यात झाली आहे.
टाळेबंदीचे नियम शिथील केल्यानंतर ह्युंदाईने ८ मे रोजी ५ हजारहून अधिक चारचाकी निर्यातीसाठी उत्पादित केल्या आहेत. कंपनीने १९९९ पासून ३० दशलक्ष चारचाकीची निर्यात केली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. किम म्हणाले, की आम्ही पूर्ववत सुरुवात केली आहे. कंपनीने मे २०२० मध्ये ५ हजारहून अधिक चारचाकीची निर्यात केली आहे.