नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या संकटात ह्युंदाई मोटर इंडियाने 20 कोटी रुपयांचा मदतनिधी जाहीर केला आहे. हा निधी कोरानाच्या मोठ्या संकटाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, तेलंगाणा आणि तामिळनाडू राज्यांसाठी वापरला जाणार आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाकडून आर्थिक मदतीशिवाय वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांना अतिरिक्त कर्मचारी पुरविण्यासाठी गरज भासल्यास मदत केली जाणार आहे. ह्युंदाई मोटरचे संचालक आणि सीईओ एस. एस. किम म्हणाले, की कोरोनाच्या संकटामुळे देशात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी राज्य व शहरांना अर्थपूर्ण मदत करण्यासाठी ह्युंदाईने संसाधने वापरण्यास सुरुवात केली आहे. तसेच मदत करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटात मदत करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. अशा कठीण प्रसंगात आपण पुष्कळदा आशा हरवून बसतो. मात्र, अशावेळी सर्वात्कृष्ट माणुसकी दाखविण्याचा काळ असतो, असेही ह्युंदाई मोटरचे संचालकांनी म्हटले आहे.
हेही वाचा-Special : वर्षभरात कोरोनाबाधित गर्भवती महिलांचे ९९ टक्के शिशु कोरोनामुक्त