नवी दिल्ली -कोरोनाच्या संकटात अनेक कंपन्या सरकारला मदत करत आहेत. ह्युंदाई मोटर इंडियाने पीएम केअर्सला ७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
संकटावर मात करण्यासाठी कंपनी आणखी मदत करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी कंपनीने तामिळनाडू मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते. कंपनीने २५ हजारांच्या कोरोना टेस्ट होवू शकतील अशा ४ कोटी रुपयांच्या डायगोन्स्टिक किट्स सरकारला दिल्या आहेत.