नवी दिल्ली-प्रवासी वाहनांच्या श्रेणीत मे महिन्यात सर्वाधिक विक्री करणारे क्रेटा हे वाहन ठरले आहे. ह्युदांई मोटर इंडियाने नुकतेच क्रेटाचे नवे मॉडेल लॉंच केले आहे. क्रेटाने मारुती-सुझुकीच्या अल्टो आणि डिझायरला पहिल्यांदाच विक्रीच्या व्यवसायात मागे टाकले आहे. क्रेटाची मे महिन्यात 3 हजार 212 विक्री झाली होती. तर मारुतीच्या एरटिगा वाहनांची मे महिन्यात 2 हजार 353 विक्री झाली होती.
ह्युदांईची मारुतीवर मात ; क्रेटा विक्रीत मेमध्ये अव्वल - Maruti Competition with Hyundai
ह्युदांई मोटर इंडियाने नुकतेच क्रेटाचे नवे मॉडेल लॉंच केले आहे. क्रेटाने मारुती-सुझुकीच्या अल्टो आणि डिझायरला पहिल्यांदाच विक्रीच्या व्यवसायात मागे टाकले आहे.
क्रेटा
वाहन उद्योगाची संघटना एसआयएएमने मे महिन्यातील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली नाही. मात्र सूत्राने ही आकडेवारी खरी असल्याची पुष्टी दिली आहे. महामारीच्या काळात कंपनीने वेगाने अनुकूलन केल्याचे ह्युंदाई मोटर इंडियाचे संचालक तरुण गर्ग यांनी सांगितले. क्रेटा मार्च 16 मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या वाहनाचे 26 हजार जणांनी बुकिंग केल्याचेही त्यांनी सांगितले.