नवी दिल्ली- ग्राहकांनी हुंदाई मोटरच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॉडेलला चांगला प्रतिसाद दिला आहे. हुंदाई मोटर इंडियाच्या ५० हजार वाहनांची ६० दिवसात एवढी विक्रमी नोंदणी झाली आहे.
हुंदाई मोटर इंडियाच्या ५० हजार वाहनांची ६० दिवसात विक्रमी नोंदणी
आजपर्यंत सर्वात अधिक हुंदाईच्या मॉडेलला प्रतिसाद मिळाल्याचा कंपनीने दावा केला आहे.
एसयूव्हीच्या लाँचिगनंतर १८ हजार चारचाकी ग्राहकांना देण्यात आल्याचे हुंदाई मोटर इंडियाचे विक्री विभागाचे प्रमुख विकास जैन यांनी म्हटले आहे. एकूण ५० हजार बुकिंगपैकी ३५ टक्के ग्राहकांनी ड्यूल क्लच ट्रान्समिशन तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याचे हुंदाईने म्हटले आहे.
आजपर्यंत सर्वात अधिक हुंदाईच्या मॉडेलला प्रतिसाद मिळाल्याचा कंपनीने दावा केला आहे. हुदांई कंपनीने २१ मे रोजी कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे लाँचिग केले. त्यापूर्वी कंपनीने २ मे रोजी प्रीलाँच नोंदणी सुरू केली होती. त्यावेळी पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मे महिन्यात २ हजार कॉम्पॅक्ट एसयूव्हीची नोंदणी केली होती.