नवी दिल्ली- देशाची अर्थव्यवस्था मंदावली असतानाही भारतीय अब्जाधीशांची संख्या आणि संपत्ती वाढली आहे. ही माहिती हरुण 'जागतिक श्रीमंत यादी २०२०' मधून समोर आली आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती एका वर्षात २४ टक्क्यांनी म्हणजे १३ अब्ज डॉलरने संपत्ती वाढली आहे. या यादीत सलग तिसऱ्यांदा अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत.
हरुण संस्थेने आज जगभरातील श्रीमंताची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये १ अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती असलेल्या २,८१७ श्रीमंतांचा समावेश आहे. या संपत्तीचे मूल्यांकन ३१ जानेवारी २०२० ला करण्यात आले आहे.
जेफ बेझोस यांची गेल्या वर्षीपेक्षा ७ अब्ज डॉलरने संपत्ती कमी झाली आहे. त्यांची अंदाजित संपत्ती ही १४० अब्ज डॉलर आहे. पत्नी मॅकन्झी यांना घटस्फोट दिल्याने त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे.
हेही वाचा-सोने प्रति तोळा होवू शकते ४७,००० हजार रुपये - मोतीलाल ओसवाल
श्रीमंताच्या यादीत पहिल्या १० जणांमध्ये समावेश असलेले मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत. ते दुसऱ्यांदा आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. दूरसंचार क्षेत्राच्या व्यवसायाने चांगली कामगिरी केल्याने त्यांची संपत्ती वाढली आहे.
हेही वाचा-क्रिकेटपटू कोहलीच्या 'विराट' ब्रँडने पुमा इंडियाचा स्पोर्ट्सवेअर व्यवसायात षटकार!
अब्जाधीशांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय अब्जाधीशांची संख्या ३४ ने वाढून १३८ झाली आहे. मुंबईत सर्वाधिक ५० अब्जाधीश राहतात. त्यापाठोपाठ नवी दिल्लीत ३० व बंगळुरूमध्ये १७ अब्जाधीश राहतात.
असे आहेत जगातील पहिले ९ श्रीमंत व्यक्ती
- जेफ बेझोस (अॅमेझॉन, १४० अब्ज डॉलर
- बर्नाड अर्नाल्ट (एलएमएचव्ही, १०७ अब्ज डॉलर
- बिल गेट्स (बिल गेट्स, १०६ अब्ज डॉलर)
- वॉरेन बफेट (बर्कशिआर हॅथवे, १०२ अब्ज डॉलर)
- मार्क झुकेरबर्ग (फेसबुक, ८४ अब्ज डॉलर)
- अरमॅनिको ओर्टेगा (झारा, ८१ अब्ज डॉलर)
- कॅर्लोस स्लिम अँड फॅमिली ( अमेरिका मोव्हिल, ७२ अब्ज डॉलर)
- सर्जी ब्रिन (गुगल, ६८ अब्ज डॉलर)
- लॅरी पेज (गुगल, ६७ अब्ज डॉलर, मुकेश अंबानी (रिलायन्स, ६७ अब्ज डॉलर), स्टीव्ह बॅलम्र (मायक्रोसॉफ्ट, ६७ अब्ज डॉलर)