नवी दिल्ली - टाळेबंदीने अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. ग्राहकांना कर्ज देणारी कंपनी होम क्रेडिट इंडियाने १ हजार ८०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीने आर्थिक फटका बसल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
कोरोना महामारीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर अभूतपूर्व परिणाम झाला आहे. प्रत्येकाचे आयुष्य, कुटुंब, ग्राहक, भागीदार आणि व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यवसाय टिकविण्यासाठी व सुरू राहण्यासाठी काही निर्णय घेण्यात आल्याचे होम क्रेडिटने म्हटले आहे. दुर्दैवाने भारतामधील १ हजार ८०० कर्मचाऱ्यांना कमी करावे लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.