महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

होंडा मोटरसायकलकडून पुन्हा उत्पादन सुरू; डीलरला करणार आर्थिक मदत

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने अधिकृत डीलरला आर्थिक मदतही जाहीर केली आहे. पूर्ण लॉकडाऊमुळे अडचणींना सामोरे गेलेल्या कंपनीच्या डीलरला ही मदत केली जाणार आहे.

HMSI
होंडा मोटरसायकल

By

Published : May 29, 2021, 9:29 PM IST

नवी दिल्ली - होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) देशभरातील विविध प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीकडून हरियाणामधील मनेसर, राजस्थानमधील तापकुरा आणि गुजरातमधील विठलपूर येथून वाहनांचे उत्पादन घेण्यात येणार आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने अधिकृत डीलरला आर्थिक मदतही जाहीर केली आहे. पूर्ण लॉकडाऊमुळे अडचणींना सामोरे गेलेल्या कंपनीच्या डीलरला ही मदत केली जाणार आहे. कंपनीकडून लॉकडाऊनच्या काळातील डीलरच्या इन्व्हेंटरीवरील व्याज होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया भरणार आहे.

हेही वाचा-रस्ते कामांमध्ये स्टीलसह सिमेंटचा वापर कमी करावा- नितीन गडकरी

सर्व भागीदारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

एचएमएसआयचे अध्यक्ष आणि सीईओ अत्सुशी ओगाटा म्हणाले, की आम्ही कोरोनाचे नियम आणि टाळेबंदीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हळूहळू उत्पादन सुरू करणार आहोत. देशात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. आम्ही परिस्थितीवर जवळून देखरेख करत आहे. सर्व भागीदारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे.

हेही वाचा-कोरोना लशीवरील जीएसटी कपातीचा चेंडू मंत्रिस्तरीय समितीच्या कोर्टात!

एचएमएसआयचे संचालक (विक्री आणि विपणन) यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, की कठीण काळात कंपनी ही डीलरला आर्थिक मदत करणार आहे.

होंडाकडून मोफत सेवेसह वॉरंटीमध्ये ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

ज्या ग्राहकांच्या वाहनांची मोफत सेवा आणि वॉरंटी ही १ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या कालवाधीत संपत आहे, त्या वाहनांसाठी मोफत सेवा आणि वॉरंटी वाढून मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. कोरोनाचे निर्बंध ३१ जुलै २०२१ नंतर शिथील तर ग्राहकांना सोयीसाठी सेवा दिली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे

ABOUT THE AUTHOR

...view details