नवी दिल्ली- दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्प कंपनीने येत्या सोमवारपासून पुन्हा उत्पाद प्रकल्प सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना महामारीमुळे हे हिरो मोटोकॉर्पने उत्पादन प्रकल्प बंद केले होते.
हिरो मोटोकॉर्प २४ मेपासून गुरुग्राम, हरियाणामधील धारुहेरा आणि उत्तराखंडमधील हरिव्दार येथील उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहेत. कंपनीने देशातील सर्व सहा उत्पादन प्रकल्प चार दिवसांसाठी बंद केले होते. हे प्रकल्प २२ एप्रिल ते २ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा १६ मे रोजीपर्यंत हे प्रकल्प बंद ठेवण्याची मुदत वाढविली होती. हिरो मोटोकॉर्प हळूहळू देशातील उत्पादनाचे कामकाज सुरू करत आहे. राजस्थानमधील नीमराना, गुजरातमधील हलोल आणि आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथील प्रकल्पही २४ मेपासून सुरू होणार आहेत.
हेही वाचा-ट्विटरने सुरू केले 'या' सहा क्षेत्रांतील व्यक्तींकरिता ब्ल्यू स्टिक व्हेरिफेकिशन