महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

हिरो मॉटोकॉर्प संशोधनात करणार १० हजार कोटींची गुंतवणूक - पवन मुंजाल

भविष्यातील गमनशीलता व्हा (बी द फ्युच्युअर ऑफ मोबिलिटी) असे ब्रीदवाक्य असणाऱ्या व्हिजन आणि मिशनची पवन मुंजाल यांनी घोषणा केली. ते म्हणाले, की संशोधन विकासातील गुंतवणुकीतून पर्यायी मोबिलिटी स्थिती, शाश्वत विकास आणि जगभरात ब्रँड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

Hero Motocorp
हिरो मोटोकॉर्प

By

Published : Feb 18, 2020, 2:30 PM IST

जयपूर - हिरो मोटोकॉर्प संशोधन आणि विकासाकरिता (आर अँड डी) येत्या ५ ते ७ वर्षांत १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याबाबतची घोषणा कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाल यांनी केली आहे. ते कंपनीमधील नवसंशोधन आणि तंत्रज्ञान केंद्रातील 'हिरो वर्ल्ड २०२०' या कार्यक्रमात बोलत होते.

भविष्यातील गमनशीलता व्हा, (बी द फ्युच्युअर ऑफ मोबिलिटी) असे ब्रीदवाक्य असणाऱ्या व्हिजन आणि मिशनची पवन मुंजाल यांनी घोषणा केली. ते म्हणाले, की संशोधन विकासातील गुंतवणुकीतून पर्यायी मोबिलिटी स्थिती, शाश्वत विकास आणि जगभरात ब्रँड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी तीन नवीन उत्पादनांची घोषणा केली

हेही वाचा-'कोरोना'चा आयातीवर परिणाम; सीआयआयची मोदी सरकारकडे अनुदानाची मागणी

गेल्या १९ वर्षांपासून कंपनी ही दुचाकींचे सर्वाधिक उत्पादन घेत आहे. २०११ मध्ये केवळ ४ देशात निर्यात करणारी कंपनी ४० देशात दुचाकी निर्यात करत आहे. सर्वात तरुण आणि श्रीमंत वारसा असलेली हिरो मोटोकॉर्प कंपनी असल्याचे मुंजाल यांनी सांगितले. हिरो मोटोकॉर्प पुढील वर्षापासून आंध्र प्रदेशमध्ये उत्पादनाची सुविधा सुरू होणार आहे.

हेही वाचा-साखर कारखान्यांसाठी 'सुगीचा हंगाम', चढे दर असताना निर्यातीची संधी

ABOUT THE AUTHOR

...view details