महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

हिरो मोटोकॉर्पच्या वाहनांच्या किमती जानेवारीत २ हजार रुपयापर्यंत वाढणार

हिरो मोटोकॉर्पच्या सर्व वाहनांच्या किमती वाढणार आहेत. या वाहनांच्या किमती विविध मॉडेलप्रमाणे आणि शहरांप्रमाणे वेगवेगळ्या असणार आहेत. या किमती कंपनीने जाहीर केलेल्या नाहीत.

हिरो मोटोकॉर्प
हिरो मोटोकॉर्प

By

Published : Dec 10, 2019, 1:55 PM IST

नवी दिल्ली - नव्या वर्षात ग्राहकांना हिरो मोटोकॉर्पच्या वाहनांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. हिरो मोटोकॉर्पने मोटारसायकल आणि स्कूटरच्या किमती २ हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.


हिरो मोटोकॉर्पच्या सर्व वाहनांच्या किमती वाढणार आहेत. या वाहनांच्या किमती विविध मॉडेलप्रमाणे आणि शहरांप्रमाणे वेगवेगळ्या असणार आहेत. कंपनीने वेगवेगळ्या वाहनांप्रमाणे किमती जाहीर केलेल्या नाहीत. कंपनीच्या मोटारसायकल आणि स्कूटर या ३९ हजार ९०० ते १.०५ लाख रुपयापर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. वाहनांच्या किमती वाढविण्याचे कारण कंपनीने दिलेले नाही.

हेही वाचा-'मारुती सुझुकी' जानेवारीपासून वाढविणार वाहनांच्या किमती


गेल्या आठवड्यात देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने किमती वाढविल्या आहेत. उत्पादक खर्च वाढल्याने मारुती सुझुकीने किमती वाढविल्या आहेत. टोयोटा, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मर्सिडिज बेन्झही वाहनांच्या किमती वाढविणार आहे. वाहनांच्या किमती जानेवारीत वाढविण्यात येणार नसल्याचे ह्युदांई मोटर इंडिया आणि होंडा कार्स इंडियाने म्हटले आहे. मात्र, बीएस-६ इंजिन क्षमतेचे निकष पूर्ण करणाऱया नव्या मॉडेलची किमती वाढणार असल्याचे ह्युदांई मोटर इंडियाने म्हटले आहे.

हेही वाचा-खूशखबर! 'या' कारची किंमत तब्बल १ लाख रुपयाने स्वस्त

ABOUT THE AUTHOR

...view details